Sunday, May 4, 2025

Ad 1
Ad 2
Ad 3

धनादेश अनादर प्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता।

अकोला :- धनादेश अनादर प्रकरणी अकोला जिल्हा न्यायालयाने आरोपीची शुक्रवारी निर्दोष मुक्तता केली आहे. सदर निर्वाळा हा न्यायाधीश डी.एस. कोलते यांनी दिला आहे.

याबाबत हकीकत अशी की, सण २०१७ मध्ये आरोपी राज राठी यांनी तक्रारदार प्रियंका जैन यांच्याकडून १ लक्ष रुपये घेतले होते. सदर रक्कमेपोटी त्यांनी तक्रारदार प्रियंका जैन यांना धनादेश व लेटरहेड दिले होते. तक्रारदार यांनी सण २०२२ मध्ये सदर धनादेश बँकेत वटविण्यासाठी लावला असता तो अनादर झाला. सदर प्रकरणी तक्रारदार यांनी आपल्या विधीज्ञ मोतीसिंह मोहता यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेत आरोपी राज राठी यांच्याविरुद्ध दावा दाखल केला. याप्रकरणी आरोपी यांच्यावतीने विधीज्ञ सुमित बजाज, ऍड. वर्षा सदर, ऍड. कुणाल शिंदे, ऍड. अमोल भोसले यांनी युक्तिवाद केला. सदर प्रकरणी शुक्रवारी न्यायालयाने दोन्ही पक्षांचे बाजू ऐकून घेत आरोपी राज राठी यांची निर्दोष मुक्तता केली.

3 Comments

Image

Leave a comment

Advertisement

© Tcs24News. All Rights Reserved.