राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाई मध्ये लाखो रुपयांची बनावट आणि अवैध दारू जप्त
बातमी परभणी राजकुमार मुंडे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने जिल्ह्यामधील अवैध दारू आणि बनावट दारू विरोधात कारवाई सुरू करण्यात आली असून या कारवाईमध्ये दोन ठिकाणी छापे मारून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर तीन आरोपींना देखील ताब्यात घेण्यात आला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बनावट दारू विरोधात ही कारवाई सुरू करण्यात आली असून या कारवाईमध्ये पाच लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कार्यवाही आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र डाँ विजय सुर्यवंशी मुंबई,संचालक अमलबजावणी व दक्षता पथक महाराष्ट्र प्रसाद सुर्वे,यांच्या निर्देशाप्रमाणे तसेच विभागिय उपआयुक्त राज्य उत्पादन शुल्क बि एच तडवी नांदेड विभाग,मा.अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क परभणी गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भ.प.निरिक्षक ए एम पठाण,परभणी हिंगोली,दुय्यम निरिक्षक सु.अ.चव्हाण,ए.बी.जाधव,ए.बी.केंद्रे,एस. आर.आल्हाट,एच एम पाकलवाड,आर.ए.चौहान,एस. एस.मोगले,बि.पी.कच्छवे,वाहनचालक भरारी पथक परभणी हिंगोली या पथकाने ही कार्यवाही केली.