Ad 1
Ad 2
Ad 3

मोटारसायकलच्या धडकेत जखमी हरणीची सुटका; वंचित बहुजन आघाडी आणि वन विभागाची तत्काळ मदत

अकोट अकोला रोड वर काल रात्री सुमारे 8:00 च्या दरम्यान ऊगवा फाट्यानजीक ऐका हरणेला  मोटारसायकल वाल्यानी उडून दिले पण मात्र ते मोटारसायकलस्वार तिथे थांबले नाही प्रफुल्ल वाघ हे थोडे मागेच होते त्यांना त्याच्या डोळ्या समोर हे दृश्य दिसल्यास ते घटनास्थळी थांबले आणी तात्काळ वंचित बहुजन आघाडी चे रंजित वाघ याना फोन लावला रंजित वाघ यांनी सामाजिक दायित्वाची जान ठेवत आपले सर्व महत्वाचे काम बाजुला ठेवून मनोज वंजारी योगीता ताई वंजारी व आपल्या सहकार्यांसोबत पोलिस स्टेशन ला माहीती देऊन वन विभागाचे अधिकारी तायडे सर यांना फोन करून माहिती सांगितली तायडे सर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने वन विभागाचे कर्मचारी आवारे साहेब व इंगोले साहेब ताबडतोब व अकोट फैल पोलिस स्टेशन चे कर्मचारी सुध्दा घटना स्थळी पोहोचले आणि जखमी अवस्थेत असलेल्या हरणीला रिसकू करण्यात आले.  या वेळी घटना स्थळी वंचित बहुजन आघाडी अकोला चे रंजित वाघ, प्रफुल्ल वाघ, मनोज वंजारी, योगीता ताई वंजारी, आणि अकोट फैल पोलिस स्टेशन चे कर्मचारी व वन विभागाचे कर्मचारी सुध्दा हजर होते

मुक्या प्राण्यांवर प्रेम केल्याने जग बदलणार नाहीये...

पण त्या प्राण्यांच जग मात्र नक्कीच बदलेल..

Advertisement

Advertisement Image

Leave a comment