बातमी परभणी राजकुमार मुंडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने परभणी शहरातील विभागीय वन अधिकारी प्रादेशिक कार्यालयामध्ये आपल्या विविध मागण्यासाठी बोंब मारो आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने यांनी वन विभागाकडे माहिती मागितली होती यामध्ये वन विभाग कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी यांच्या हजेरी मस्टर चे तपासणी करण्यात यावी कर्मचाऱ्यांचा हजेरी पटावर महिनाच्या सह्या नसतात यावर देखील मनसेतर्फे प्रश्न विचारण्यात आले होते सोबतच वन विभागातील टेंडर ऑनलाईन प्रणाली द्वारे काढण्यात यावा यासह अन्य मागण्या ठेवण्यात आल्या होत्या परंतु वन विभागाकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर मनसेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले यावेळी तीव्र घोषणाबाजी देखील देण्यात आली.