• Sat. Aug 30th, 2025

चंद्रपुर येथील खुल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा विजेता अकोल्याचा विशाल नंदागवळी

ByTcs24News

Feb 14, 2024
चंद्रपुर येथील खुल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा विजेता अकोल्याचा विशाल नंदागवळी

अकोला जफर खान ( दि १३ फेब्रुवारी,२०२४)-चंद्रपुर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथे खुली राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजीत केली होती. स्पर्धेचे हे पहिलेचं वर्ष होते.सर्वोदय महाविद्यालय गोंडपिपरी, ओ.बी.सी. कृती समिती, शिक्षण व रोजगार बचाव समिती, मानवतावादी विचार प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने १० फेब्रुवारीला गोंडपिपरी येथील खैरे कुणबी समाज भवनात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा पार पडली.

या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्हयातुन जवळपास ७० स्पर्धक सहभागी झाले होते.त्यामध्ये आपल्या अकोल्याच्या विशाल नंदागवळी यांनी बाजी मारली आणि प्रथम क्रमांक पटकावीला रोख रक्कम ७,०००/- सातहजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे होते.

विशाल नंदागवळी यांनी या आधी देखील विविध वादविवाद, वक्त्तृत्व स्पर्धेत तसेचं सांस्कृतीक व सामाजीक कार्यात अग्रेसर राहुन अकोल्याचे नाव उंचावले आहे.

Advertisements

शिव-फुले-शाहु-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचे प्रबोधन देखील ते सातत्याने करीत असतात.

नायगाव येथील डंपीग ग्राऊंडच्या बाजुच्या परिसरात कचरा वेचणाऱ्या शाळाबाह्य मुलांसाठी ते शाळा देखील चालवतात. अनेक पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झाले आहेत.

त्यांच्या या यशामुळे संपु्र्ण अकोला जिल्ह्यातून त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. डॅा एम आर इंगळे, डॅा संजय पोहरे, महेंद्र डोंगरे, डॅा मनोहर वासनिक, प्रा राहुल माहुरे, प्रा प्रकाश गवई, प्रा ॲड आकाश हराळ, विक्की मोटे, राहुल कुरे, अमित लोंढे, आदित्य बावनगडे, आकाश जाधव, शुभम गोळे, सागर तेलगोटे, रोहन काळे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Advertisements
Advertisements

Advertisements
Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Footer